
नाशिक : अशोका मार्गावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना दि. 22 जून रोजी घडली आहे. भावेश किशोर कोठारी (40, रा. नाशिकरोड) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे.
मुंबई नाका पोलिस ठाण्यात पोलिस नाईक सिद्धार्थ बिरारी यांच्या फिर्यादीनुसार, 22 जूनला रात्री कोठारी हे त्यांच्या एमएच 19, एडब्ल्यू 3411 दुचाकीवरून अशोका मार्गाकडे जात होते. त्यावेळी खड्ड्यात दुचाकी गेल्याने ते खाली पडले. यात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी भावेश विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- murder : नातवानेच केला आजीचा खून; नाशिकच्या हरसूल येथील घटना
- नाशिककरांनो ऑनलाइन व्यवहार करताना सावधान; अशा प्रकारे होऊ शकते फसवणूक
- रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपीस 10 वर्षे कारावासासह दंड
The post नाशिक : खड्ड्यात आदळून दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.