नाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले, महिलेची पोत खेचून पळाले

सोनसाखळी चोर www.pudhari.news

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

खरेदीच्या बहाण्याने दुकानात येऊन दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची पोत खेचून नेल्याची घटना आडगाव शिवारातील शरयू पार्क येथे घडली. या प्रकरणी मीनाक्षी दिनकर ठानगे (रा. शरयू पार्क १) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

मीनाक्षी यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. ३) रात्री सव्वाआठच्या सुमारास दुचाकीवरून दोन चोरटे दुकानात आले. दोघांपैकी एक जण खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरला व मीनाक्षी यांच्याकडे पेन मागितला होता. मीनाक्षी या पेन आणण्यासाठी जात असतानाच चोरट्याने झटापट करून त्यांच्या गळ्यातील अर्धी चेन खेचून दुचाकीवरून पळ काढला. चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत मीनाक्षी यांच्या चेहऱ्यास दुखापत झाली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले, महिलेची पोत खेचून पळाले appeared first on पुढारी.