
नाशिक : खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने ट्रायलच्या बहाण्याचे दुचाकी पळविल्याची घटना मुंबई नाका परिसरात उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रेयस संजय बोथरा (२९, रा. जैन काॅलनी, गायकवाडनगर) यांच्या मोबाइलवर अनोळखी इसमाने संपर्क साधत दुचाकी घेण्याची तयारी दाखविली. त्यानंतर भामट्याने बोथरा यांची दुचाकी (एमएच १५, एएम ८४००) ट्रायलसाठी घेऊन जात असल्याचे सांगून दुचाकीसह पोबारा केला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Supreme Court : भारतात जन्मलेल्या पाकिस्तानी ‘मोहम्मद’ला जामिनावर भारतात राहण्यासाठी परवानगी
- जयसिंगपूर : शिरोळ तालुक्यात ढगफुटी; सांगली-कोल्हापूर बायपास महामार्ग पाण्याखाली
- मच्छिमारांच्या किसान क्रेडिट कार्डला केराची टोपली ; केंद्राच्या आदेशाला दिला खो
The post नाशिक : खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाने ट्रायलच्या बहाण्याने दुचाकी पळविली appeared first on पुढारी.