नाशिक : खर्डेत साखळी उपोषणाला माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांची भेट

देवळा ; खर्डे ता. देवळा येथे मंगळवारी दि. ३१ पासून सुरू असलेल्या साखळी उपोषणस्थळी आज गुरुवारी (दि. २) माजी आमदार शिरिषकुमार कोतवाल यांनी भेट दिली. यावेळी कोतवाल यांच्या समवेत मविप्रचे तालुका संचालक विजय पगार, गोविंद पगार उपस्थित होते.

कोतवाल यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सत्ताधारी वेळकाढू पणाचे धोरण अवलंबित आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी सम्पूर्ण महाराष्ट्र पेटून उठला असतांना हे बघ्याची भूमिका घेताना दिसून येत असून, सरकारला याची किंमत मोजावी लागेल. राज्य सरकार सर्व बाबतीत अपयशी ठरले असून, जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत घरी पाठविल्या शिवाय राहणार नाही. सरकारने उपोषण, आंदोलन कर्त्यांचा अंत न पहाता तात्काळ मार्ग काढून आरक्षण द्यावे अन्यथा सरकारला यापेक्षाही मोठ्या रोषाला बळी पडावे लागेल असा इशारा याप्रसंगी कोतवाल यांनी दिला.

जरांगे -पाटील यांच्या उपोषणाला पाठींबा म्हणून समस्त सकल मराठा समाजाच्या वतीने खर्डेत गेल्या तीन दिवसांपासून साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणास सर्व स्तरातून वाढता पाठिंबा मिळत आहे. गुरुवारी उपोषणस्थळी पंचक्रोशीतील कणकापूर येथील अॅड तुषार शिंदे, उपसरपंच जगदीश शिंदे, काशिनाथ महाराज शिंदे, दादाजी शिंदे, गोविंद बर्वे, बापू शिंदे, विजय जैन, साहेबराव सावकार, भाऊसाहेब शिंदे, संजू बर्वे, दादा गोसावी, सोनू शिंदे, योगेश शिंदे, संजय शिंदे, आबा सावकार, खंडू बच्छाव, रमेश सावकार, उत्तम शिंदे, अशोक शिंदे, कडू महादू, बंटी बर्वे, शिवसेनेचे सुनील शिंदे आदींनी भेट देऊन आपला सहभाग नोंदवला. यावेळी खर्डे उपसरपंच बापू जाधव, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख विजय जगताप, संदीप पवार, माधव ठोंबरे, सचिन गांगुर्डे, कारभारी जाधव, प्रहारचे कृष्णा जाधव, युवा जिल्हाध्यक्ष बापू देवरे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : खर्डेत साखळी उपोषणाला माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांची भेट appeared first on पुढारी.