नाशिक : खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाजीराव सूर्यवंशी

खालप ग्रामपंचायत,www.pudhari.news

देवळा (जि. नाशिक) : खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाजीराव महादू सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली. खालप ग्रामपंचायतीच्या मावळत्या उपसरपंच कांताबाई पिंपळसे यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने ह्या रिक्त पदासाठी शुक्रवारी (दि. २०) रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच विमल सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी उपसरपंच पदासाठी बाजीराव सूर्यवंशी यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची बिनविरोध निवड घोषित करण्यात आली. त्यांना सूचक म्हणून सुनील सूर्यवंशी यांनी स्वाक्षरी केली.

यावेळी सरपंच विमल सूर्यवंशी, सदस्य सुनील  सूर्यवंशी, बेबीबाई  सूर्यवंशी, कांताबाई पिंपळसे, हिरामण पवार, मुरलीधर अहिरे, विजया देवरे, ग्रामविकास अधिकारी सुदर्शन बच्छाव आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच बाजीराव सूर्यवंशी यांचे भाजपचे जिल्हा नेते केदा आहेर, वसाकाचे माजी संचालक आनंदा देवरे, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, शेतकी संघाचे चेअरमन कैलास देवरे, प्रशांत सूर्यवंशी, साहेबराव सूर्यवंशी, अविनाश सूर्यवंशी, जिभाऊ सूर्यवंशी, राकेश सूर्यवंशी, दिनेश जाधव आदींनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : खालप ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी बाजीराव सूर्यवंशी appeared first on पुढारी.