
नाशिक (दातली) : पुढारी वृत्तसेवा
शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी पायी जाणार्या यात्रेकरूंना खासगी बसने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोन तरुण साईभक्त ठार झाल्याची दूर्दैवी घटना घडली. अपघातानंतर फरार झालेली खासगी बस एमआयडीसी पोलिसांनी शिर्डी येथून ताब्यात घेतली. याप्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
मुसळगाव औद्योगिक वसाहतीत सिन्नर-शिर्डी महामार्गावर मंगळवारी (दि.20) पहाटे 6 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. बी. एस. एल. कंपनीसमोर पाठीमागून आलेल्या बसने धडक दिली. संजय शंभू जाधव (23) व महेश शंकर सिंग (23, दोघे रा. मीरा रोड, मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही शिर्डीला जाणार्या पदयात्रेत सहभागी झाले होते. दुर्देवाने या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.
मुंबई येथील साई संस्कृती फाउंडेशन व राज प्रतिष्ठानच्या वतीने काढण्यात आलेली पायी पालखी दिंडी सोहळा मुसळगाव औद्योगिक वसाहतीत संस्थेच्या कार्यालयाजवळ मुक्कामी होती. पहाटे साई पदयात्रेकडून उठून शिर्डी रस्त्याने जात असताना मुंबईकडून शिर्डीकडे जाणार्या खासगी बसने (एमएच 04 जीपी 1291) संजय जाधव व महेश सिंग या दोघा यात्रेकरुंना धडक दिली. त्यानंतर खासगी बस शिर्डीकडे पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. धडकेत दोघे गंभीर जखमी झाले.
हेही वाचा :
- Women’s Cricket : पाचव्या टी-20 सामन्यातही ऑस्ट्रेलियाकडून भारत पराभूत
- sarso ka saag ‘सरसों का साग’ ची रेसिपी २,५०० वर्षांपुर्वीची!
- Ramdev BaBa : योग गुरू रामदेव बाबा यांचे ‘तसे’ कार्टून बनवणा-या ‘त्या’ दोघांवर गुन्हा
The post नाशिक : खासगी बसच्या धडकेत दोन साईभक्त ठार appeared first on पुढारी.