
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
तवली फाटा येथील एका घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्याने सुमारे सव्वा लाखांचा ऐवज लंपास केला आहे. पांडुरंग चिमणा कामडी (६३, रा. समर्थ नगर, तवली फाटा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याने १२ ते १३ डिसेंबर दरम्यान, खिडकीचे गज कापून घरात शिरला. घरातील कपाटात ठेवलेले सुमारे ४५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे तर ११ हजार ७०० रुपयांचे चांदीचे दागिने व एक हजार रुपयांचे दोन गॅस सिलींडर असा १ लाख २१ हजार ४५० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. याप्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- रत्नागिरी : पत्रकारांचा अवमान करणाऱ्या ‘त्या’ विद्यापीठ अधिकाऱ्यांना मंत्री अब्दुल सत्तार यांनी सुनावले
- पारनेर : बबन कवाद याला नगर, पुणे जिल्हाबंदी
- रायगड : ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी अँटी करप्शन कार्यालयात चौकशीला हजर
The post नाशिक : खिडकीचे गज कापून घरफोडी, सव्वा लाखांच्या ऐवजावर डल्ला appeared first on पुढारी.