नाशिक : खेळता खेळता लहान मुलाने गिळलं नेलकटर

नेल कटर गिळलं ,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा  : आतापर्यंत तुम्ही बाळाने नाणे गिळल्याच्या बातम्या ऐकल्या असतील. पण, नाशिकमध्ये एका आठ महिन्याच्या बाळाने चक्क नेलकटर गिळल्याची घटना घडली आहे.  बाळाने खेळता-खेळता नेलकटर गिळल्याचा हा प्रकार येथील नाशिकरोड भागात घडला.

येथील के. जे मेहता शाळा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता नेलकटर गिळले. आडगाव येथील डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेज मधील डॉक्टरांनी ऑपरेशन करून नेलकटर बाहेर काढले. सद्या मुलगा डॉक्टरांच्या देखरेखीत असून तो सुखरूप असल्याचे कळते.

सोमवारी ( दि.१९ ) नाशिकरोड परिसरातील के. जे मेहता शाळेच्या परीसरात शिंदे कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांच्या घरातील आठ महिन्याच्या मुलाने खेळता खेळता नेलकटर गिळलं.  आपल्या मुलाने नेलकटर गिळल्याचे आईच्या लक्षात येताच आईने त्यास जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण तेथे त्याच्यावर उपचार करणे शक्य नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. शिंदे कुटुंबाने तातडीने मुलाला मराठा विद्या प्रसारक समजाच्या डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेज मध्ये दाखल केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून येथील डॉक्टरानी मुलाचे सायंकाळी ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला. डॉ. पोल व त्यांचा सहकारी डॉक्टरांनी यशस्वी ऑपरेशन केले.

डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक 
दरम्यान आठ महिन्याच्या बाळाने नेलकटर गिळल्याने ऑपरेशन करून ते बाहेर काढणे हे अतिशय अवघड काम होते. पण डॉ. वसंतराव पवार मेडीकल कॉलेज मधील डॉक्टरांनी यशस्वी ऑपरेशन करून मुलाचे प्राण वाचविले. त्यामुळे सर्वत्र डॉक्टरांचे कौतुक केले जाते आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : खेळता खेळता लहान मुलाने गिळलं नेलकटर appeared first on पुढारी.