नाशिक : गजानन मंदिरात रंगली सुरेल गीतांची मैफल

गजानन महाराज मंदिर,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
‘परब्रह्म मूर्ती..’, ‘देवाचिये द्वारी..’, ‘या जन्मावर..’, ‘चाफा बोलेना..’, ‘माझी रेणुका माउली..’, ‘पाहिले ना तू मला…’, ‘ही पौर्णिमा हे चांदणे..’, ‘रुपेरी वाळूत..’, ‘ही गुलाबी हवा..’, ‘कैवल्याच्या चांदण्यात..’, अशा एकापेक्षा एक गीतांनी श्रोते मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते नाशिकरोडच्या गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे आयोजित भक्ती व भावगीत मैफिलीचे.

आमदार राहुल ढिकले, गजानन तितरे, माजी नगरसेवक संभाजी मोरुस्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. गायक ओंकार वैरागरकर, सारिका वैरागकर, ईश्वरी वैरागकर, रितिका गायकवाड, सुचित्रा सिंग, अर्चना सूर्यवंशी, श्यामला महाशब्दे यांनी गीते सादर केली. त्यांना प्रज्योत आढाव, हितेश्वर पाटील यांनी वाद्यावर साथसंगत केली. शुभांगी देवधर यांनी निवेदन केले.

‘नमन गणेशा प्रथमेशा..’, ‘ओंकार स्वरूपा..’, ‘गजानना श्री गणराया..’, ‘केशवा माधवा..’, ‘देव माझा विठू सावळा..’, ‘शोधीशी मानवा..’, ‘एकाच या जन्मी..’, ‘शुक्रतारा मंदवारा..’, ‘नदीच्या पल्लाड’ आदी गीते सादर करण्यात आली. सुहास आडसूळ, दत्ता कुलकर्णी, हेमंत नाईक, विवेक दंडवते, रमेश राव, अ‍ॅड. नंदकुमार सूर्यवंशी, अनिल शिरसाठ, श्याम कुंदळ, यशवंत शिंदे, कांता वराडे, विजया कंकरेज, प्रभा पारगांवकर, आसावरी मोरुस्कर, अनिता मदाने, शुभदा बोडस, ज्योती जाधव, शेखर साळी, महेश भोपे, जयंतीलाल लाहोटी, सूरज सगर यांनी संयोजन केले.

हेही वाचा :

The post नाशिक : गजानन मंदिरात रंगली सुरेल गीतांची मैफल appeared first on पुढारी.