
नाशिक (सप्तशृंगगड) : पुढारी वुत्तसेवा
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगडावर प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी हजेरी लावून देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या समवेत महामंडलेश्वर सविदानंद सरस्वती महाराज उपस्थित होते.
आशा भोसले यांनी देवीला साडी – चोळीची ओटी भरून पूजा, अभिषेक केला. या प्रसंगी संस्थानचे विश्वस्त ॲड. दीपक पाटोदकर यांनी देवीची प्रतिमा, प्रसाद देऊन आशा भोसले यांचे स्वागत केले. गायिका भोसले यांनी गुरुवारी (दि. 15) अचानक गडावर हजेरी लावल्याने त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी भाविकांसह ग्रामस्थांनी गर्दी केली होती. यावेळी संस्थानचे भीकन वाबळे, व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, सोपान कानमंडले आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
पूर्वी आम्ही लतादीदींसह दरवर्षी सहकुटुंब गडावर येऊन देवीचे दर्शन घेत असत. मात्र, गेल्या पाच ते सहा वर्षांपासून येणे कमी झाले होते. आज पुन्हा गडावर येऊन देवीचे दर्शन घेतल्याने मनाला समाधान वाटत आहे. – आशा भोसले, गायिका.
हेही वाचा:
- ग्रामपंचायत निवडणूक : गावकारभारी होण्यासाठी उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, नेत्यांचे देव पाण्यात!
- पुणे : मद्यधुंद कारचालकाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; अपघातग्रस्त कारही पलटी
- Rajkumar Santoshi : दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांची ९ वर्षांनंतर वापसी, नव्या चित्रपटावरून वाद?
The post नाशिक : गायिका आशा भोसले सप्तशृंगी चरणी लीन appeared first on पुढारी.