
नाशिक/पुणे : पुढारी वृत्तसेवा
नाशिक शहराचा पारा रविवारी 13.3 अंशांवर खाली आला. शहराने महाबळेश्वरलाही मागे टाकत राज्यात पुण्यानंतर सर्वांत कमी तापमानाची नोंद केली. उत्तर भारतात सोमवारपासून पश्चिमी चक्रवात सक्रिय होत आहे. लवकरच देशात थंडीच्या लाटेची शक्यता आहे. तत्पूर्वी, मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्र गारठण्यास सुरुवात झाली असून, राज्यातील काही शहरांत किमान तापमानाचा पारा 12 ते 13 अंशांवर खाली आला आहे. रविवारी सायंकाळी पाच वाजता पुणे शहराचा पारा 12.6 अंशांवर, तर नाशिकचा पारा 13.3 अंशावर आला. पहाटेपर्यंत हा पारा अजून खाली जाण्याची शक्यता आहे. राज्यातील थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरचे पारा रविवारी 13.8 अंशावर होता.
राज्यातील प्रमुख शहरांचे रविवारचे किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे (12.6), जळगाव (14), कोल्हापूर (17.7), महाबळेश्वर (13.8), नाशिक (13.3), सांगली (17.2), सातारा (14.3), सोलापूर (16.1), मुंबई (24), रत्नागिरी (22.2), उस्मानाबाद (15.2), औरंगाबाद (13), परभणी (15.8), नांदेड (16.4), अकोला (17.6), गोंदिया (17), नागपूर (16.8).
हेही वाचा :
- कोल्हापूर : पर्यटनातून कोट्यवधीची उलाढाल
- पुणे : आणखी 25 ठेकेदार काळ्या यादीत; क्षेत्रीय कार्यालयांकडील 255 रस्ते आढळले निकृष्ट
- कोल्हापूरकरांना हुडहुडी!
The post नाशिक गारठले, पारा 'इतक्या' अंशांवर appeared first on पुढारी.