नाशिक : गुंतवणूकदार महिलेला 85 लाखांचा गंडा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एक्स्पोर्ट व्यवसायात चांगला आर्थिक परतावा देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील एकाने नाशिकच्या महिलेला 85 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. स्मिता संदीप वडेरा (रा. उदयनगर, गंगापूर रोड) यांच्या फिर्यादीनुसार, संशयित गुल रूपचंद क्रिपलानी (रा. कुलाबा, मुंबई) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मिता यांच्या फिर्यादीनुसार, संशयित क्रिपलानीने ऑक्टोबर 2016 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत गुंतवणुकीवर जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवून 85 लाख रुपये घेतले. मात्र क्रिपलानी यांनी पैसे परत न करता, ठाणे येथील शेतजमीन स्मिता यांच्या नावावर करून देण्याचे कबूल केले होते. मात्र क्रिपलानी यांच्या नावे कोणतीही शेतजमीन नसताना खोटा दस्त तयार करून विश्वासघात केला.

हेही वाचा:

The post नाशिक : गुंतवणूकदार महिलेला 85 लाखांचा गंडा appeared first on पुढारी.