
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा
गॅस गिझरचा भडका होऊन भाजलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राजेश पांडुरंग आढवणे (54, रा. दिंडोरी नाका) असे या व्यक्तीचे नाव आहे. गॅस गिझर लीक होऊन त्यातून भडका उडाल्याने राजेश हे गंभीररीत्या भाजले होते. त्यांना 11 ऑगस्टला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हेही वाचा:
- पती म्हणायचा ‘तू सुंदर दिसत नाहीस’, कोर्ट म्हणाले, ‘पत्नीची इतर स्त्रियांशी तुलना म्हणजे मानसिक क्रूरताच!’
- नाशिक : हाती तिरंगा घेत भाविकांची ब्रह्मगिरी फेरी
- पुणे : नोकरीच्या आमिषाने 46 हजारांचा गंडा
The post नाशिक : गॅस गिझरच्या भडक्यात एकाचा मृत्यू appeared first on पुढारी.