नाशिक : गॅस पंपावर चोरी करणारे गजाआड

गॅस पंप www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गॅस पंपावरील कर्मचार्‍यास चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडील रोकड जबरदस्तीने हिसकावून नेणार्‍या चौघांना पंचवटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौघांविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात जबरी चोरी, मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदेश ऊर्फ काळू सुधाकर पगारे (21, राहुलवाडी, पेठ रोड), दगडू ऊर्फ विकी लक्ष्मण जोजे (21, रा. अमरधामजवळ, पंचवटी), विकी नरेश शिंदे (22, रा. नानावली) व नीलेश श्रीपत उफाडे (19, रा. कालिकानगर, पंचवटी) अशी या चौघा संशयितांची नावे आहेत. सचिन संजय सातभाई (24, रा. गिते मळा, मुंबई नाका) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (दि.25) रात्री 9.30 च्या सुमारास एमएच 15 झेड, 9677 क्रमांकाच्या रिक्षातून चौघे संशयित गॅस पंपावर आले. त्यांनी सचिन यास चाकूचा धाक दाखवून सचिनच्या खिशातील सात हजार 550 रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर संशयितांनी सचिनला शिवीगाळ करीत मारहाण केली व जीवे मारण्याची धमकी देत संशयित पसार झाले. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पंचवटी पोलिस करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : गॅस पंपावर चोरी करणारे गजाआड appeared first on पुढारी.