नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन

गोदाकाठी लक्ष्मीपूजन,www.pudhari.news

नाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा

शहरातील पर्यावरणप्रेमींनी गोदावरी नदीकिनारी सायंकाळी 7.30 ला दीप प्रज्वलित करून लक्ष्मीपूजन साजरे केले.

गाव व शहराला नदीमुळे खरी ओळख असते. नदीमुळेच मानवी वसाहत तयार होते. पुढे तिचे गाव व शहरात रूपांतर होते आणि भौतिक सुख व शहरी सुविधा उपलब्ध झाल्याने मनुष्य ज्या नदीच्या आसर्‍याने वास्तव्य करतो, तिलाच विसरून सण-उत्सवात मग्न होतो. परंतु नदीचे पावित्र्य, मांगल्य जपत नदी स्वच्छ राहावी, यासाठी नदीला लक्ष्मी मानून पर्यावरणप्रेमींनी फटाके न वाजवता नदीकिनारी दीप लावून नदीची पूजा करून खर्‍या अर्थाने लक्ष्मीपूजन केले.

यावेळी सर्वांसाठी सुख व समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. यावेळी सार्वजनिक वाचनालयाचे संजय करंजकर, प्रा. सोमनाथ मुठाळ, उदय थोरात, डॉ. अजय कापडणीस आदींसह या उपक्रमाचे आयोजक निशिकांत पगारे व कपिला नदी संवर्धन समितीचे योगेश बर्वे उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदाकिनारी पर्यावरणप्रेमींचे लक्ष्मीपूजन appeared first on पुढारी.