नाशिक : गोदावरीला पूर, अनेक मंदिरे पाण्याखाली

गोदावरीला पूर,www.pudhari.news

नाशिक : नाशिक शहरासह ग्रामीण भागात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग केला जात आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी वाहत असून, अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. नदी काठावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दोन दिवसांपासून जिल्ह्यामध्ये पाऊस परतला असून, गुरुवारी (दि.15) ठिकठिकाणी त्याने हजेरी लावली. नाशिक शहर व परिसरात दिवसभर हलक्या ते मध्यम सरी बरसल्या. काल येथील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी होते आजही तिच स्थिती आहे. पावसाचा जोर वाढल्यास धरणातून विसर्ग वाढावा लागेल. त्यामुळे गोदावरी नदी काठच्या व्यावसायिकांनाही स्थलांतराच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

त्र्यंबकेश्वर आणि गंगापूरच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असल्याने धरणाच्या विसर्गात वाढ करण्यात आली. त्यामुळे गोदाघाट पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. येत्या 24 तासांत जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गोदावरीला पूर, अनेक मंदिरे पाण्याखाली appeared first on पुढारी.