नाशिक : गोदावरी संवर्धन समितीतर्फे गोदापूजन, आरती

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
गोदावरी निर्मल अविरत प्रवाहित राहावी व तिच्याबरोबर तिच्या उपनद्याही स्वच्छ, अविरत वाहाव्यात या उद्देशाने गोदावरी संवर्धन समितीच्या वतीने गोदावरी पूजन व आरती करण्यात आली. यावेळी निर्मल अविरत गोदावरीसाठी सर्वांच्या वतीने गंगा गोदावरीला प्रार्थना करण्यात आली.

या आधी कपिला, वरुणा, नंदिनी, वालदेवी या चारही नद्यांचे जलपूजन व आरती असा उपक्रम पार पडला. याप्रसंगी मनपा अतिरिक्त आयुक्त अशोक आत्राम, भक्तिचरणदास महाराज यांच्या हस्ते व पुरोहित संघाचे सतीश शुक्ल यांच्या मंत्रोच्चारात हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमात शहरातील विविध पर्यावरणप्रेमी, गोदाप्रेमी व सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमाचे आयोजन गोदावरी संवर्धन समितीचे निशिकांत पगारे यांनी केले. यावेळी विभागीय अधिकारी कैलास राभडिया, योगेश बर्वे, दीनानाथ महाराज, राजेश पंडित, उदय थोरात, सुनील परदेशी, चंदू पाटील, सोमनाथ मुठाळ, रामसिंह बावरी, संजय करंजकर, प्रकाश बेळे, गणेश बर्वे, वीरेंद्र टिळे, दत्तू बोडके, श्याम गोसावी, ब्रह्मगिरी पुष्पादीदी, मोहिनी भगरे, सुनीता पगारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : गोदावरी संवर्धन समितीतर्फे गोदापूजन, आरती appeared first on पुढारी.