नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महिलेचा विनयभंग

विनयभंग ,www.pudhari.news

नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर एकाने महिलेचा वारंवार पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार, मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित विलास रामचंद्र नागरगोजे (रा. गायत्रीनगर, नाशिक पुणे- रोड) याच्याविरोधात विनयभंगाची फिर्याद दाखल केली आहे.

पीडितेच्या फिर्यादीनुसार, त्या बुधवारी (दि.१) सकाळी गोल्फ क्लब मैदान येथे वाॅक करत असताना संशयिताने पाठलाग करून पीडितेसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. या आधीही संशयिताने १० ते १५ दिवस पाठलाग केला होता. त्यामुळे गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : गोल्फ क्लब मैदानावर महिलेचा विनयभंग appeared first on पुढारी.