नाशिक : ‘ग्रंथ तुम्हारे द्वार’ हिंदी ग्रंथ योजनेचा दुबईत श्रीगणेशा

Granth www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
भाषा, पुस्तके यांचा पूल जोडणार्‍या ‘ग्रंथ तुम्हारे द्वार’ या अभिनव हिंदी पुस्तकांच्या ग्रंथपेटीचा श्रीगणेशा दुबई येथील ‘हॉटेल पेशवा’ येथील एका समारंभात झाला. विश्वास ज्ञानप्रबोधिनी, ग्रंथ तुमच्या दारी, यूएई विभाग, विश्वास गार्डन, माय बुक बास्केट यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम पार पडला. विश्वास ठाकूर, विनायक रानडे यांनी या योजनेला मूर्तरूप दिले आहे. याप्रसंगी मुख्य वित्त अधिकारी शराफ समूह मनोज खटोड, लेखक आणि युनिसेफचे शैक्षणिक सल्लागार राजीव तांबे, यूएईचे समन्वयक डॉ. नितीन उपाध्ये, शिवमोहन, समन्वयक सुभाष केळकर उपस्थित होते. डॉ. सीमा यांनी सरस्वती वंदना सादर केली. यावेळी झालेल्या कवी संमेलनात कौसर भुट्टो, देवयानी राणी, नूपुर दुबे, रिकुंजी, स्नेहल देशपांडे, समशाद हुसेन, डॉ. रेयाज अहमद, डॉ. वसीम यांनी सहभाग घेतला. मनोज खटोड यांनी दोन ग्रंथपेट्यांचे प्रायोजकत्व स्वीकारल्याचे जाहीर केले.

हेही वाचा:

The post नाशिक : ‘ग्रंथ तुम्हारे द्वार’ हिंदी ग्रंथ योजनेचा दुबईत श्रीगणेशा appeared first on पुढारी.