
नाशिक : ग्राहक म्हणून आलेल्या चोरट्याने मॉलमध्येच लपून राहत रात्री किमती ऐवज लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. ही घटना त्र्यंबक नाका येथील पिनॅकल मॉल येथे 11 ते 12 जुलैदरम्यान घडली. या प्रकरणी चोरट्याविरोधात मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश रवींद्रसिंग बायस (29, रा. उपनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 11 जुलैला रात्री चोरटा ग्राहक बनून मॉलमध्ये आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत साहित्य ठेवण्याची ट्रॉलीदेखील होती. चोरटा मॉलमध्येच लपून बसला. त्यानंतर रात्री चोरट्याने 60 हजार 544 रुपयांचा ऐवज लंपास केला. आकाश यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात घरफोडीची फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत चोरटा मॉलमधीलच कर्मचारी असल्याचा संशय आहे.
हेही वाचा :
- आषाढी यात्रेतील स्वयंसेवी संस्थांचा सन्मान
- मालदीवमध्ये ‘जन गण मन’चे सूर
- लक्ष्मण मानेंच्या प्रवेशामुळे वंचितांना न्याय मिळेल : आ. जयंत पाटील
The post नाशिक : ग्राहक म्हणून आलेला चोरटा रात्री मॉलमध्येच लपून बसला, साहित्यावर डल्ला appeared first on पुढारी.