नाशिक : घरात खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाचा झोक्याचा गळफास लागल्याने मृत्यू

सिडको, पुढारी वृत्तसेवा : घरात खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाचा झोक्याचा गळफास लागल्याने मृत्यू झाल्याची घटना अंबड परिसरातील आशीर्वाद नगर येथे घडली. अंबड परिसरातील आशीर्वाद नगर म्हाडा कॉलनी  येथे राहणारे निंबा सैंदाणे व त्यांच्या पत्नी दिनांक २८ जुलै रोजी संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास कामानिमित्त  घराबाहेर गेलेले असतांना त्यांचा दहा वर्षीय मुलगा निखिल निंबा सैंदाणे हा घरात एकटाच होता. घरात खेळत असतांना घरात बांधण्यात आलेल्या झोक्याचा गळफास लागून त्याचा मृत्यू झाला. निंबा सैंदाणे व त्यांच्या पत्नी घरी आल्यानंतर त्यांचा सदर प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ निखिल यांस उपचाराकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याबाबत अंबड एम. आय. डी. सी. पोलीस चौकी येथे अकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार कैलास चव्हाण करीत आहेत.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : घरात खेळत असलेल्या दहा वर्षीय मुलाचा झोक्याचा गळफास लागल्याने मृत्यू appeared first on पुढारी.