नाशिक : घरात घुसून बालिकेचा विनयभंग करणार्‍यास सश्रम कारावास

बालिकेचा विनयभंग,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नऊवर्षीय बालिकेचा घरात घुसून अश्लील वर्तन करत विनयभंग करणार्‍या नराधम आरोपीला विशेष न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

गणेश सदाशिव जाधव (24, रा. टिकोनी गल्ली, सिन्नर, नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सिन्नरच्या खडकपुरा परिसरात 3 ऑगस्ट 2015 रोजी पीडिता दुपारी घरी एकटी असल्याचा फायदा घेऊन जाधव तिच्या घरात शिरला. त्याने पीडित बालिकेला मोबाइलमधील न्यूड चित्रफिती दाखवून तिच्याशी अश्लील वर्तन केले. याबाबत सिन्नर पोलिस ठाण्यात पोक्सोन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन महिला उपनिरीक्षक टी. एन. आठवले यांनी तपास करत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. सबळ पुरावे आणि सहा साक्षीदार तपासल्यानंतर विशेष न्यायाधीश देशमुख यांनी जाधवला 3 वर्षे सश्रम कारावास व 3 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. विशेष सरकारी वकील म्हणून दीपशिखा भिडे यांनी काम पाहिले.

हेही वाचा :

The post नाशिक : घरात घुसून बालिकेचा विनयभंग करणार्‍यास सश्रम कारावास appeared first on पुढारी.