Site icon

नाशिक : घातक औषधांचा साठा जप्त; जनावरांचे दूध वाढवण्यासाठी केली जात होती विक्री

नाशिक ( मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा
मालेगावात दुग्धजन्य जनावरांचे दूध वाढवण्यासाठी घातक औषधांची निर्मिती व विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी (दि.20) पवारवाडी पोलिसांनी म्हाळदे शिवारात केलेल्या कारवाईत हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पोलिसांनी एकास अटक केली असून एकूण 95 हजार 450 रूपये किंमतीचा घातक औषधसाठा जप्त केला आहे.

म्हाळदे शिवारातील महेबूदा हसन मशिदीजवळ एका पत्र्याच्या गोडावूनमध्ये हा प्रकार सुरु असल्याची पवारवाडी पोलिसांना मिळाली होती. आरोपी शगफ मुस्ताक नाचन (47, मूळ रा. बोरवली जि. ठाणे ह.मु. हिरापुर, मालेगाव) याच्याकडे औषध निर्मिती, साठवणूक, विक्री किंवा वितरणाचा कोणताही परवाना नसतांना तो हे कृत्य करीत होता. या गोडावून मध्ये तो दुग्धजन्य जनावरांचे दुध वाढावे यासाठी एक घातक औषध (ऑक्सिटोसीन oxytocin) तयार करीत असे तसेच अतिशय क्रूरतेने ते जनावरांना दिले जात होते. हे औषध दिलेल्या जनावरांचे दुध मानवी आरोग्यासाठी देखील घातक असल्याचे समोर आले आहे. पोलिसांना याची माहिती मिळताच अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक प्रशांत ब्राम्हणकर यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला. यावेळी आरोपी नाचन यास अटक करण्यात येऊन घातक औषधे जप्त करण्यात आली. पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जे. बडगुजर यांना करीत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : घातक औषधांचा साठा जप्त; जनावरांचे दूध वाढवण्यासाठी केली जात होती विक्री appeared first on पुढारी.

Exit mobile version