नाशिक: घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल

pramod

घोटी, पुढारी वृत्तसेवा: पूर्ववैमनस्यातून तरुणाचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी (दि.१३) रात्री घोटी येथील जुना कोल्हार रोडवरील रामरावनगर येथे घडली. या प्रकरणी संशयित दोघा सख्ख्या भावांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. Nashik crime news

प्रमोद (पम्या) गंगाराम शिंदे ( वय ३६, रा. रामरावनगर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा विनायक बोराडे, वैभव विनायक बोराडे अशी संशयित सख्ख्या भावांची नावे आहेत. Nashik crime news

विशेष म्हणजे खून झालेला तरुण आणि संशयित आरोपी यांच्यामध्ये चांगली मैत्री होती. यापूर्वी खून केलेल्या तरुणाला इगतपुरी पोलिसांनी तीन पिस्टलसह अटक केली होती. या घटनेनंतर विभागीय पोलीस अधिकारी सुनील भामरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील घटनास्थळी दाखल झाले. आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना केली असून या गुन्ह्यात अनेक संशयितांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार, उपनिरीक्षक सुदर्शन आवरी, हवालदार विक्रम झाल्टे, मारुती बोराडे, शिवाजी शिंदे यांचा सहभाग आहे.

हेही वाचा 

The post नाशिक: घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.