नाशिक : चांदवडमध्ये उद्या मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय कँडल मार्च

  • Post author:
  • Post category:Uncategorized

चांदवड, पुढारी वृत्तसेवा : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी व मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ (दि.२८) रोजी सायंकाळी ५ वाजता सर्वपक्षीय कॅन्डल मार्च (मोर्चा) काढण्यात येणार आहे.

या कँडल मोर्चास चांदवड शहरातील सर्व नागरिक बंधू भगिनींनी गणुर चौफुली येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा कँडल मोर्चा शासकीय विश्रामगृह ते नगर परिषद कार्यालय असा काढण्यात येणार आहे. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्च्यांची सांगता होणार असल्याचे सकल मराठा समाजाच्या समन्वयक यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

The post नाशिक : चांदवडमध्ये उद्या मनोज जरांगे-पाटील यांच्या समर्थनार्थ सर्वपक्षीय कँडल मार्च appeared first on पुढारी.