
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
चांदवड तालुक्यात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली. या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका द्राक्ष, कांदा, टोमॅटो पिकांना बसणार आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी पुन्हा एकदा नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात सापडला आहे. कांदा, द्राक्ष पिकांना कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च देखील वसूल होत नाही आहे, अशात अवकाळी पावसाने दस्तक देत शेतकऱ्यांच्या दुःखात विरजण टाकीत हजेरी लावल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. अस्मानी संकटाला सामोरे जाताना सरकारने मदत करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे.
हेही वाचा:
- Meghalaya | मेघालयात संगमांना ४५ आमदारांचा पाठिंबा, उद्या शपथविधी, पीएम मोदी उपस्थित राहणार?
- काँग्रेसकडून 9 रोजी कर्नाटक बंदची हाक
- Facebook Reel : ‘फेसबुक’वर आता 90 सेकंदांचे रील शक्य
The post नाशिक : चांदवडलाही अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना फटका appeared first on पुढारी.