
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाचेची मागणी करत तडजोडी अंती १० हजारांची लाच स्वीकारताना चांदवडचे उपकोषागार अधिकारी सुनील तडवी (वय ४९) यांना नाशिक लाचलुचपत विभागाच्या पथकाच्या पोलिस निरीक्षक गायत्री जाधव-पाटील यांनी रंगेहाथ अटक केली.
नाशिक येथील ४९ वर्षीय तक्रारदाराचे थकीत वेतनाचे बिल मंजूर करण्यासाठी व कोणतेही आक्षेप न घेण्याच्या मोबदल्यात १५ हजार रुपयांची लाचेची मागणी तडवी यांनी केली होती. यात तडजोडीअंती १० हजार रुपये देण्याचे ठरले होते. यामुळे तक्रारदाराने नाशिक येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीनुसार गायत्री जाधव-पाटील, पोलिस नाईक प्रकाश महाजन, पोलिस नाईक नितीन कराड, परशुराम जाधव यांच्या पथकाने चांदवडला सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना तडवी यांना अटक केली. या प्रकरणी चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा :
- Nashik : अंकुश शिंदे नाशिकचे नवे पोलीस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षकपदी सुनील फुलारी
- IPL Auction 2023 : आयपीएल लिलावात 405 खेळाडूंवर लागणार बोली
- पुणे : गो ग्रीनला थंड प्रतिसाद , पाच लाख वीजग्राहक या योजनेचे लाभार्थी
The post नाशिक : चांदवडला उपकोषागार अधिकारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.