नाशिक : चांदवड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर

ग्रामपंचायत निवडणूक

नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा

चांदवड तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. यात पदाचा दिलेला राजीनामा, निधनामुळे किवा अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी हि पोट निवडणूक होत असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार अमित पवार, दिलीप मोरे यांनी दिली.

यात तालुक्यातील दरेगाव, खेलदरी, तळवाडे, हरनूल, वडबारे, मंगरू, कानमंडाळे, शिरसाणे व निमोण ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी संगणकप्रणालीनुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या बनवण्यात आल्या आहेत. त्या तहसील कार्यालय, संबंधित तलाठी कार्यालय व ग्रामपंचायत कार्यालयात शुक्रवार (दि.२४) रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या प्रारूप मतदार याद्यांवर शुक्रवार (दि.२४) ते गुरुवार (दि.२) रोजी पर्यंत हरकती व सूचना दाखल करण्यात येणार आहे. अंतिम मतदार याद्या गुरुवार (दि.९) रोजी प्रसिद्ध केल्या जाणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : चांदवड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर appeared first on पुढारी.