
नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा
चायनीज हॉटेलमध्ये खुर्चीचा धक्का लागल्याच्या कारणावरून चार जणांनी मिळून एकावर दगड व तीक्ष्ण वस्तूने हल्ला चढवत गंभीर जखमी केले.
चायनीजच्या दुकानात धक्का लागल्याच्या कारणाने तिघा-चौघांनी वणी येथील प्रकाश गांगोडे (२४) यांच्यावर दगड व तीक्ष्ण हत्याराचा वापर करत डोक्यावर, पाठीवर, मांडीवर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु दुखापत गंभीर असल्याने त्याला नाशिकच्या शासकीय रुग्णालयात अधिक उपचारासाठी दाखल केले आहे. प्रदीप जाधव तेथे नाश्ता घेण्यासाठी गेला होता. त्या भांडणाचा काहीच संबंध नव्हता, परंतु त्या भांडणातही त्याच्या मानेवरही दुखापत झाली असून, त्याच्यावर उपचार करण्यात आले. वणी पोलिस ठाण्यात घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर जाऊन चौकशी करत चार तासांतच तिघा संशयितांना ताब्यात घेतले असून, एक फरार आहे.
हेही वाचा:
- FIFA WC and France : …तर फ्रान्स ठरेल सलग दुसर्यांदा विश्वविजेतेपदाला गवसणी घालणारा जगातील तिसरा देश
- Shraddha Kapoor : रणबीर- श्रद्धाच्या TJMM चित्रपटाचे पोस्टर रिलीज, श्रद्धाने दिला नाव ओळखण्याचा टास्क
- Prajakta Mali : प्राजक्ता माळीवर मिश्किल कमेंट🌹; ‘काय प्राजू तू पण.!
The post नाशिक : चायनीज खाणे पडले महागात appeared first on पुढारी.