नाशिक : चालत्या बसने घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला

गाडीने घेतला पेट,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन 

पेठहून नाशिकला येणा-या बसने अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी घडली. गाडीतून अचानक धूर निघू लागल्याने चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. अग्निशामक दलाला कळविण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने वेळीच आग विझविण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली.

सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली ऩाही. 30 ते 40 प्रवासी बसमध्ये होते. बसमधून धूर निघू लागताच प्रवाशांनी आरडाओरडा केला. यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत बस कडेला उभी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी मदत केल्याने अग्निशमन दलास आग भडकण्यापूर्वी विझविण्यात यश आले. त्यामुळे मोठी दुर्घटना होता होता टळली असून बसमधील सर्व प्रवासी सुखरुप आहेत.

छायाचित्रे : हेमंत घोरपडे

हेही वाचा :

The post नाशिक : चालत्या बसने घेतला पेट, चालकाच्या प्रसंगावधानाने अनर्थ टळला appeared first on पुढारी.