नांदगांव; पुढारी वृत्तसेवा : नांदगाव तालुक्यातील चिंचवीर तांडा येथील दोन १६ वर्षीय युवतींचा चिंचवीर तांडा येथे बंधाऱ्यात पडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. ८) घडली.
पूजा अशोक जाधव (वय १६), खुशी देवा भालेकर (वय १६ ) आणि कावेरी देवा भालेकर (वर्ष १८) या तिघीजणी कपडे धुण्यासाठी चिंचेवीर तांड्याजवळ केटी बंधाऱ्यावर गेल्या होत्या. यावेळी त्यांचा बंधाऱ्यातील पाण्यात पाय घसरून पडल्या. त्यानंतर तिघींना ग्रामीण रुग्णालय नांदगाव येथे दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. राठोड यांनी पूजा जाधव आणि खुशी देवा भालेकर यांना मृत घोषित केले. या दोन्हींची आकस्मित मृत्यूची नोंद नांदगाव पोलिसात दाखल करण्यात आली असून पुढील तपास पीएसआय वाघमारे हे करत आहेत तर कावेरी देवा भालेकर ही या घटनेत सुदैवाने बचावली. तिला पुढील औषध उपचारा कामी मालेगाव सिविल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
The post नाशिक : चिंचविहिर दोन अल्पवयीन मुलींचा पाण्यात पडून मृत्यू तर एक जखमी appeared first on पुढारी.