
देवळा : पुढारी वृत्तसेवा: कला शिक्षकाचा चिंचावड-निंबोळा रस्त्यावर बुलेट व कार अपघातात मृत्यू झाला. राजेंद्र तोताराम सूर्यवंशी (वय ४२, रा. नवलाने, ता. जि. धुळे) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. ते बोरगाव ता. सुरगाणा येथील धैर्यशीलराव पवार माध्यमिक विद्यालयात कलाशिक्षक होते. Nashik car accident
देवळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि .१६) सायंकाळी चिंचावड-निंबोळा रस्त्यावर शिवनाल्याजवळ निंबोळा शिवारात मालेगावहून कळवणच्या दिशेने जाणाऱ्या बुलेटला ( एमएच १५ एचके ७४५६) मागून येणाऱ्या कार (एमएच ०५ डीएच ३०६६) ने जोरदार धडक दिली. तेथून कारचालक फरार झाला. या अपघातात राजेंद्र सूर्यवंशी यांच्या छातीस व तोंडाला जबर मार लागून रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. Nashik car accident
या घटनेबाबत चिंचावड (ता. मालेगाव) येथील पोलीस पाटील संदीप खैरनार यांनी देवळा पोलिसांत फिर्याद दिली. त्यानंतर अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गवळी करत आहेत.
राजेंद्र सूर्यवंशी हे सुरगाणा तालुक्यातील बोरगाव येथे कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते. ते आपल्या धुळे जिल्ह्यातील मूळगाव नवलाने येथून कळवण येथे जात होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
हेही वाचा
- नाशिकच्या ‘त्या’ शेतकऱ्यांनी शरद पवारांसह घेतली नितीन गडकरी यांची भेट
- नाशिक : सहसंचालक पुणे विभागाने वेतन रोखल्याने शिक्षक निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा
- Pune Drug Case : ड्रग्जचे धागेदोरे नाशिक, मुंबई व्हाया पुणे; आणखी 7 जणांचा शोध; पाटील, बलकवडेच्या कोठडीत वाढ
The post नाशिक: चिंचावड-निंबोळा रस्त्यावर कारच्या धडकेत कलाशिक्षक ठार appeared first on पुढारी.