
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
गांधीनगर येथील काॅम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या कार्यक्रमात आता पुढील वर्षी पारंपारिक चिता अन चेतक हेलिकॉप्टरऐवजी आत्मनिर्भर भारत उपक्रमांतर्गत एचएएल निर्मित लाईटवेट हेलिकॉप्टर सहभाग घेतील असे प्रतिपादन आर्मी एव्हिएशन कॉर्प्सचे महासंचालक, कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल अजयकुमार सुरी यांनी केले.
गांधीनगर येथील काॅम्बॅट आर्मी एव्हीएशनच्या (कॅट) प्रशिक्षण केंद्राच्या कंम्बाईन्ड पासिंग आउट परेड लष्करी आधिकाऱ्यांना विंग प्रदान करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी ( दि.२६ ) झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कम्बाइंड पासिंग आउट परेडच्या अभ्यासक्रमांत यशस्वी ठरलेल्या लष्करी आधिकाऱ्यांचा फ्लाईंग विंग, पदक देऊन गौरव झाला. हेलिकॉप्टरवर आरूढ होत जमिनीपासून शेकडो फूट उंच चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवित खडतर प्रशिक्षणाचे प्रदर्शन करणाऱ्या भावी सैनिकांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फडले. येथील कॉम्बॅट कोर्स एव्हिएशन हेलिकॉप्टर प्रशिक्षण अभ्यासक्रम आणि बेसिक रिमोटली पायलेटड एअरक्राफ्ट सिस्टम कोर्सचा दीक्षान्त समारंभ उत्साहात झाला. यात ३७ अधिकारी आज पायलटरूपाने देशसेवेत दाखल झाले आहेत. पायलट प्रशिक्षण पुर्णत्वाबद्दल २१ अधिकाऱ्यांना एव्हिएशन विंग्स तर ८ जणांना एव्हिएशन हेलिकॉप्टर प्रशिक्षक (एव्हिएशन हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर) पूर्णत्वानंतर क्वालिफाईड फ्लाइंग इंस्ट्रक्टर (क्यूएफआय) पदक देऊन गौरविले.

यांचा झाला गौरव –
कॅप्टन जीव्हीपी प्रथुष यांना कॉम्बॅट एव्हिएटर्स कोर्स 39 च्या प्रशिक्षण तुकडीत पहिले स्थान मिळाल्याबद्दल ‘सिल्व्हर चीता’ ट्रॉफी मिळाली. त्याचप्रमाणे सर्वोत्कृष्ट आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर
कोर्स 38, मेजर हर्षित मल्होत्रा यांना ‘मेजर प्रदीप अग्रवाल’ ट्रॉफीने गौरविण्यात आले. मेजर प्रणित कुमार यांना (‘बेस्ट इन ग्राउंड सब्जेक्ट्स’) मेजर विवेक कुमार सिंग यांना (‘फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट ट्रॉफी फॉर बेसिक) यांच्यासह आरपीएएस प्रशिक्षणात मेजर पल्लव वैशंपायन यांना ‘ग्राउंड विषयातील सर्वोत्कृष्ट’ आणि लेफ्टनंट कमांडर अनिल कुमार यादव या दोन आधिकायांना उड्डाण प्रशिक्षक (बाह्य-अंतर्गत पायलट निरीक्षक) म्हणून ‘फर्स्ट इन ऑर्डर ऑफ मेरिट इन क्वालिफाईड फ्लाइंग इन्स्ट्रक्टर’ ट्रॉफी देउन गौरविण्यात आले.
आई – वडील भावूक
आपल्या मुलांचा होणारा सन्मान पाहत आई वडिलांची छाती अभिमानाने भरली, तर काहींच्या डोळ्यात आनंदाचे अश्रु होते. त्याचप्रमाणे आपल्या मुलाचे कर्तृत्व पाहून उपस्थित नातेवाईकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव प्रकट होतांना दिसले.
हेही वाचा :
- पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात; ट्रक, पिकअपच्या धडकेत १० मेंढ्या ठार
- पुणे-बंगळूर महामार्गावर घुणकी फाट्याजवळ रोड रोलरला आर्टिगा गाडीची धडक; २ ठार, ४ गंभीर जखमी
- शिंदे गटात कुरबुरी, पण गद्दारांसाठी आमचे दरवाजे कायमचे बंद : संजय राऊत
The post नाशिक : चित्तथराक प्रात्यक्षिकांनी फेडले डोळ्यांचे पारणे, ३७ पायलट देशसेवेत दाखल appeared first on पुढारी.