
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
येवला शहरात सुफीबाबा नावाने परिचित असलेले अफगाणी सुफी धर्मगुरू ख्वाजा सय्यद चिश्ती यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (दि. 8) चिश्ती यांची पत्नी तिरीना यांचा जबाब नोंदविला आहे. त्यांच्या जबाबातून हत्येचे आणखी धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते.
पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तिघा संशयितांना बेड्या ठोकल्या असून, उर्वरित तीन मारेकर्यांच्या शोधार्थ तीन पथके रवाना करण्यात आली आहेत. शुक्रवारी (दि. 8) चिश्ती यांची पत्नी तिरीना यांचा सविस्तर जबाब नोंदवून घेतला. त्यांच्या जबाबातून हत्येचे आणखी धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याचे समजते. त्या आधारे पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, चिश्ती यांचे वडीलही लवकरच भारतात येत आहेत. त्यांनी केंद्रीय मंत्रालय स्तरावर व्हिसासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. नाशिक पोलिसांकडून सय्यद चिश्ती यांची चौकशी केली जाणार आहे. त्यातून काही माहिती समोर येण्याची शक्यता वर्तविली आहे.
हेही वाचा :
- Amarnath cloudburst : अमरनाथमध्ये ढगफुटी, मृतांचा आकडा १५ वर, ४० अद्याप बेपत्ता
- नाशिक : घोलप, बागूल यांची राऊत दौर्याकडे पाठ, 15 माजी नगरसेवकांनीही मारली दांडी
- लघुग्रहांच्या धडकेतूनच पृथ्वीवर जीवसृष्टीचे झाले बीजारोपण
The post नाशिक : चिश्तीच्या हत्ये प्रकरणी पत्नीचा जबाब ; धागेदोरे पोलिसांच्या हाती appeared first on पुढारी.