नाशिक : चुंचाळे शिवार घरकुल जवळ भंगार दुकानास भीषण आग

चुंचाळे शिवारात आग,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा 

चुंचाळे शिवार घरकुल जवळ भंगार दुकानास भीषण आग लागली आहे. पहाटे ३ वाजता येथील भंगार दुकानाला लागलेली आग अजूनही सुरू आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू असून आगीने रौद्र रूप धारण केले आहे.

आगीत सुमारे ७ ते ८ दुकाने जळाले असण्याची शक्यता आहे. सिडको, सातपुर व अंबड औद्योगिक वसाहत या तीन ठिकाणचे अग्नीशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : चुंचाळे शिवार घरकुल जवळ भंगार दुकानास भीषण आग appeared first on पुढारी.