नाशिक : चुलत भावाने केला भावाचा खून

गणेश पंजाब पठाडे www.pudhari.news
देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
भगुर येथे सासरी बहिणीला सोडविण्यासाठी आलेल्या भावाला चुलत भावानेच जबर मारहाण करत खून केल्याची घटना घडली असून चुलती व पुतण्या यांच्या नात्याला काळिमा फासण्याच्या कारणातुन उलगडा झाला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रज्ञा सिध्दार्थ कांबळे (30, रा. भगुर) व मयत गणेश पंजाब पठाडे (25, रा. हिंगोली) हे दोघे बहिण भाऊ आहेत. गणेश हा बहिणीला सासरी सोडविण्यासाठी आला होता. मंगळवारी (दि.8) सकाळी साडे दहाच्या सुमारास मोबाईल रिचार्ज करुन येतो. असे सांगून घराबाहेर पडला. मात्र, सायंकाळपर्यंत तो घरी परतला नसल्याने बहिणीने भावाची शोधाशोध सुरू केली. यादरम्यान सहा साडेसहा वाजता नागझिरा नाल्यालगत एक युवक बेशुद्ध अवस्थेत बेवारसपणे पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल होऊन उपचारासाठी सदर युवकाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. गणेशचा चुलत भाऊ अमोल अंबादास पठाडे (28, रा. विहीतगाव, नाशिकरोड) याने मित्राच्या मदतीने गणेशला बेदम मारहाण करत खुन केला असल्याचे प्रज्ञा यांनी तक्रारीत नोंदवले आहे. याप्रकरणी संशयित आरोपी अमोल पठाडे याच्यासह चार जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच याप्रकरणी आणखी काही आरोपी असल्याची शक्यता वर्तवली जात असून अमोल पठाडे याने गणेशला विविधठिकाणी नेऊन मारहाण केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. प्रज्ञा कांबळे हिने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी अमोल पठाडे याच्या विरोधात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत गणेशच्या पश्चात आई, वडील, भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : चुलत भावाने केला भावाचा खून appeared first on पुढारी.