नाशिक : चोरट्याने चोरल्या दहा रिक्षांच्या टायरसह स्टेपनी

सातपूर : पुढारी वृत्तसेवा

अशोकनगर येथील पवार संकुल परिसरातून बुधवारी (दि. 5) मध्यरात्रीनंतर १२ ते पहाटे ४ च्या सुमारास चोरट्यांनी तब्बल 10 रिक्षांचे टायर व स्टेपनी चोरून नेल्याची घटना घडली. हा प्रकार सकाळी उघडकीस आला. याबाबत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, पवार संकुल येथे घरासमोर रिक्षाचालक रिक्षा उभ्या करतात. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या आठ ते दहा रिक्षांचे टायर व स्टेपनी चोरून नेल्या. त्यामुळे रिक्षाधारकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सामाजिक कार्यकर्ते अनिल गडाख यांनी परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : चोरट्याने चोरल्या दहा रिक्षांच्या टायरसह स्टेपनी appeared first on पुढारी.