नाशिक : जलतरणपटूंनी कमावले सुवर्णपदक

kheladu www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजमाता जिजाऊ जलतरण तलावात सराव करणार्‍या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत सुवर्ण आणि रौप्यपदक मिळविले. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मनपा मुख्यालयात 11 विजेत्या खेळाडूंशी संवाद साधत त्यांचा सत्कार केला.

शहरातील वैष्णवी आहेर आणि राधिका महाले यांची पोर्तुगाल येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय पॅटथलॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कझाकिस्तानमध्ये झालेल्या एशिया कप स्पर्धेत राधिकाने सुवर्णपदक मिळविले आहे. बंगळुरू येथे झालेल्या आयसीएसई शालेय राष्ट्रीय स्पर्धेमध्ये मयंक धामणेने तीन सुवर्णपदके आणि श्रावणी गडाखने तीन रौप्यपदके पटकावली आहेत. सुमेध कुलकर्णी यानेही या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. तसेच अहमदाबाद येथे झालेल्या ज्युनियर वुमन्स ‘खेलो इंडिया’ या स्पर्धेत नाशिकच्या आदिती हेगडे आणि रुजुला कुलकर्णी यांनी पदकांची लयलूट केली. पुणे येथे झालेल्या केंद्रीय झोनल स्पर्धेमध्ये आयुषी देवधर हिला एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळाले. धुव्र धामणे, प्रेम यादव यांनीही विभागीय स्पर्धेत यश मिळविले. विजेत्या खेळाडूंचे कौतुक करण्यात आले. विजेत्यांना प्रशिक्षक शंकर मादगुंडी, विकास भडांगे यांचे मार्गदर्शन मिळाले. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरण तलावाच्या व्यवस्थापिका माया जगताप, अनिल ढेरिंगे यांचे खेळाडूंना सहकार्य लाभले.

हेही वाचा:

The post नाशिक : जलतरणपटूंनी कमावले सुवर्णपदक appeared first on पुढारी.