
सिन्नर : पुढारी वृत्तसेवा
केंद्रीय राखीव सुरक्षा बलातील जवान गणेश गीते दुचाकीवरून तोल जाऊन मोटार सायकलसह गोदावरी उजवा कालव्यात पडल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. तथापि कुटुंबातील पत्नी, मुलगा, मुलीला वाचविण्यात यश आलेले असून त्यानंतर जवान वाहून गेल्याने सुमारे 18 ते 20 तास उलटूनही शोध लागलेला नाही.

बचाव पथक गुरुवारी सायंकाळपासून दाखल झालेले असून अद्यापही शोध सुरू आहे. पालकमंत्री दादा भुसे हे घटनास्थळी दुपारी एक वाजता दाखल झाले. मात्र पंचकोशीतील संतप्त ग्रामस्थांनी पालकमंत्री भुसे यांना घेराव घालत सुमारे वीस तास उलटूनही जवानाचा शोध लागत नसल्याबद्दल रोष व्यक्त केला. तसेच गोदावरी कालवा गुरुवारी रात्री का बंद केला नाही याचा पालकमंत्र्यांना जाब विचारण्यात आला. जलसंपदा विभागाच्या कार्यपद्धतीबाबत नातेवाईक व ग्रामस्थांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. मालेगाव व नाशिक येथील बचाव पथके हे घटनास्थळी दाखल असून बचाव कार्य सुरू आहे.
The post नाशिक : जवान गीते यांचा अद्यापही शोध लागेना, पालकमंत्र्यांना नातेवाईकांचा घेराव appeared first on पुढारी.