
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
205 विद्यार्थ्यांनी 205 मनाचे श्लोक याचे सुलेखन करून जागतिक विक्रमाची नोंद केली. या उपक्रमाची संकल्पना शिक्षिका अलका चंद्रात्रे यांची होती. स्वामी विवेकानंद सोसायटी संचालित टी. जे. चौहान माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘सुलेखन याग’ मध्ये सहभाग नोंदविला होता. गंगापूर रोड येथील बालाजी मंदिरात हा उपक्रम पार पडला. ‘चार चौघं’ यांनी उपक्रमाचे नियोजन केले होते. विद्यार्थांनी मनाचे श्लोक पठण केले. पूजा-निलेश गायधनी व त्यांच्या सहका-यांनी विद्यार्थ्यांना सुलेखनाचे धडे देऊन हस्तलिखितासाठी सिध्द केले. जागतिक विक्रमाची नोंद आणि प्राप्त दाखला याचे विमोचन संस्थेचे अध्यक्ष विक्रम सारडा यांनी केले. यावेळी अॅड अविनाश भिडे, अलका चंद्रात्रे, आशिष कुलकर्णी, प्रमोद भार्गवे, राहुल वावीकर, अवधूत देशपांडे आणि चार चौघंचे सी. एल. कुलकर्णी, एन. सी. देशपांडे, विनायक रानडे आदी उपस्थित होते. यावेळी ढोल, ताशाच्या गजराने परिसर दुमदुमून गेला होता.
हेही वाचा:
- मी तुला प्रत्येक ठिकाणी शोधते, जान्हवीची पोस्ट व्हायरल
- नगर : गंजबाजार मार्केट बनले जनावरांचा गोठा ! सर्वत्र पसरले घाणीचे साम्राज्य
- नगर : गंजबाजार मार्केट बनले जनावरांचा गोठा ! सर्वत्र पसरले घाणीचे साम्राज्य
The post नाशिक : जागतिक विक्रमाची नोंद करत विद्यार्थ्यांनी गिरवले मनाचे श्लोक appeared first on पुढारी.