
नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील औद्योगिक वसाहतीमधील एका ॲग्रिकल्चर कंपनीला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे.
जानोरी येथील औद्योगिक वसाहतीतील संसस ॲग्रिकल्चर कंपनीला मंगळवारी (दि.16) सकाळी दहाच्या सुमारास आग लागली. कंपनीमधील केमिकलचे ड्रम व डबे आगीच्या विळख्यात आल्याने या डब्यांनी पेट घेतल्याने कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोट होत असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. आग लागल्याचे कळविताच तातडीने नाशिक येथील अग्निशामक वाहन घटनास्थळी दाखल झाले व कंपनीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात आली आहे. त्यानंतर मात्र अग्निशामक वाहनातील पाणी संपल्यानंतर शेजारील शेतकऱ्याच्या विहिरीतील पाणी अग्निशामक वाहनात टाकण्यात आले व कंपनीची आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशामक वाहनातील कर्मचाऱ्यांनी यशस्वी केला.
हेही वाचा:
- भिगवण मार्गावरील सेवा रस्ता बनला पार्किंग हब
- Cabinet Decision: अवकाळीग्रस्तांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची कार्यवाही करा ; मुख्यमत्र्यांचे मंत्रिमंडळ बैठकीत निर्देश
- डीके शिवकुमार दिल्लीत दाखल, पक्षश्रेष्ठींबरोबर करणार चर्चा
The post नाशिक : जानोरी एमआयडीसीतील ऍग्रीकल्चर कंपनीला आग appeared first on पुढारी.