नाशिक : जालना येेथील घटनेच्या निषेधार्थ उद्या कळवण बंदची हाक

कळवण,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

कळवण तालुक्यात जालना येथील घटनेचे चांगलेच पडसाद उमटले असून तालुक्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. जालना येथील अंतरवाली सराटी गावात मराठा समाजावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ उद्या कळवण बंदची हाक देण्यात आली आहे.

‘मराठा आंदोलकांवर बेछूट लाठीचार्ज केल्या प्रकरणी जालना येथील पोलिस अधिक्षकांना तातडीने निलंबित करण्यात यावे, तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. दोषींवर योग्य ती कारवाई न झाल्यास लाठीचार्जच्या निषेधार्थ, मराठा क्रांती मोर्चातर्फे कळवण तालुका बंद पुकारण्यात येईल. त्यास सर्वस्वी शासन, प्रशासन जबाबदार राहील. असा इशारा कळवण तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे.

The post नाशिक : जालना येेथील घटनेच्या निषेधार्थ उद्या कळवण बंदची हाक appeared first on पुढारी.