Site icon

नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘आप’चे अनोखे आंदोलन

नाशिक : पुढारी ऑनलाइन

गॅस दरवाढीविरोधात व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळालाच पाहिजे यासाठी आम आदमी पार्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून त्यावर भाकरी थापून आणि कांद्याच्या माळा गळ्यात घालून कांदा फोडून जेवणाचे दृश्य मांडून आप कार्यकर्त्यांकडून अनोखे आंदोलन करण्यात आले.

ज्या पद्धतीने उद्योगपती आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार ठेवतो, त्याचप्रमाणे शेतकऱ्याला सुद्धा आपल्या मालाचा भाव ठरविण्याचा अधिकार मिळाला पाहिजे अशी मागणी आप कार्यकर्त्यांनी यावेळी केली. आम आदमी पार्टीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या गेटवर हे अनोखे आंदोलन केले.

यावेळी पूर्व विधानसभेचे अध्यक्ष योगेश कापसे, देवळाली विधानसभेचे अध्यक्ष गिरीश उगले पाटील, उत्तर महाराष्ट्र युवा अध्यक्ष अभिजीत गोसावी, शहर युवा अध्यक्ष अमर गांगुर्डे, शहर युवा सचिव प्रदीप लोखंडे, पूर्व महिला अध्यक्ष शेतांबरी आहेर, प्रसिद्धी प्रमुख चंदन पवार, युवा उपाध्यक्ष संदीप गोडसे, आणि पदाधिकारी मेघराज भोसले, अनिल फोकणे, नविंदर अहलुवालिया, दिपक सरोदे, नंदू ठाकरे, संतोष राऊत, चंद्रशेखर महानुभव, दिलीप कोल्हे, सुमित शर्मा, विश्वजित सावंत, निर्मला दाणी, शकुंतला वाघ, स्वप्नील घिया, शांताबाई बनकर, मंगला पोरजे ,पुष्पा विष्णू आहेर सखुबाई धुळे, मोना लक्ष्मण जाधव, मीना महाले कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 'आप'चे अनोखे आंदोलन appeared first on पुढारी.

Exit mobile version