Site icon

नाशिक : जिल्हा उपनिबंधक खरे लाच घेताना जाळ्यात

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांना सोमवारी 30 लाख रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.

दिंडोरी बाजार समिती प्रकरणी तक्रार अर्ज दाखल करण्यात आला होता. या अर्जावरील निकाल बाजूने देण्याच्या मोबदल्यात खरे यांनी तक्रारदारकडून ३० लाख रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रार मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला.

तक्रारदारांकडून तीस लाख रुपये घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खरे यांना ताब्यात घेतले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. विभागाचे एक पथक खरे यांच्या मालमत्तेसह घर झडतीसाठी रवाना करण्यात आले.

The post नाशिक : जिल्हा उपनिबंधक खरे लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version