नाशिक : जिल्हा कबड्डी स्पर्धेत शिवशक्तीचे दुहेरी यश

कबड्डी www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशन आयोजित कुमारगट निवड चाचणीत आडगाव येथील शिवशक्ती मंडळाने कुमार व कुमारी गटात दुहेरी यश संपादन केले.

कुमारमध्ये स्वप्निल जाधव, शशिकांत बालकांड, हरी रिकामे यांचा उत्स्फूर्त सहभाग तसेच शिवतेज नवले, सचिन देशमुख, प्रसाद मते यांनी केलेल्या नेत्रदीपक कबड्डी खेळातील पकडी महत्वाच्या ठरल्या. संतोष मते, सनी मते, मनिष माळोदे, आदिनाथ मते, सचिन मते, मेघनाथ माळोदे, सुरेश शिंदे यांचा मार्गदर्शनाखाली खेळाङुंनी सुरेख खेळ करत विजयश्री मिळवली. कुमारी गटामधे महिलांनी जोरदार खेळ करून विजय खेचून आणला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष रंगनाथ शिंदे नाशिक मनपा असोसिएशनचे उपाध्यक्ष दादासाहेब देशमुख, दत्ता गायकवाड मंडळाच्या वरिष्ठ खेळाङुंनी यशस्वी खेळाङुचे अभिनंदन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हा कबड्डी स्पर्धेत शिवशक्तीचे दुहेरी यश appeared first on पुढारी.