नाशिक : जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या व्हा. चेअरमन पदी भारत कोठावदे यांची निवड

भरत कोठावदे,www.pudhari.news

देवळा (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील अमृतकार पतसंस्थेचे चेअरमन भारत कोठावदे यांची नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या व्हा.चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.

नुकत्याच झालेल्या नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालकांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यानंतर आज झालेल्या चेअरमन व्हा. चेअरमन पदाच्या निवडणुकीत  कोठावदे यांची फेडरेशनच्या व्हा. चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.

त्याच्या या निवडीबद्दल आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, संचालक भाऊसाहेब पगार, नगराध्यक्षा सुलभा आहेर, माजी उपनगराध्यक्ष अतुल पवार, देमको चे व्हा.चेअरमन डॉ.प्रशांत निकम, संचालक योगेश वाघमारे, राजेंद्र सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे. फेडरेशनच्या माध्यमातून पतसंस्थांचा विकास साधने तसेच नवनवीन आर्थिक उपक्रम राबवण्यासाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्यरत राहू असे कोठावदे यांनी सांगितले.

हेही  वाचा : 

The post नाशिक : जिल्हा पतसंस्था फेडरेशनच्या व्हा. चेअरमन पदी भारत कोठावदे यांची निवड appeared first on पुढारी.