नाशिक जिल्हा परिषदेतर्फे कोरोना काळात आतापर्यंत ६५ टक्के निधी खर्च – लीना बनसोड

नाशिक : राज्यात सत्तांतर झाल्यावर निधी परत जाण्याचे प्रमाण प्रचंड होते. त्यामुळे पालकमंत्री छगन भुजबळ यांना सलग दोन वेळा बैठक घ्यावी लागली होती. त्यात जिल्हा परिषदेने अवघा 15 टक्के खर्च केला होता. विकासाचा ठणाणा होता. त्यामुळे प्रशासनाचे कान उफटावे लागले होते. यंदा ती स्थिती बदलली. कोरोनामुळे सरत्या वर्षात प्रशासनापुढे अनेक समस्या होत्या. लॅाकडाऊनसह अनेक अडचणीत विकासाचा गाडा ठप्प झाला. मात्र नाशिक जिल्हा परिषदेने त्यातूनही मार्ग काढला. या कालावधीत जिल्हा परिषदेतील विविध विभागामार्फेत मंजूर निधीच्या ६५ टक्के निधी खर्च करण्यात आला अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांनी दिली.

पुढील दोन महिन्यात प्रमाण वाढविण्याच्या सूचना
ग्रामीण भागात विकासाची विविध कामे पूर्ण करण्याच्या उद्देनाने जादा निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जानेवारी महिन्याच्या अखेरीस जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बुधवारी विभाग प्रमुखांची बैठक घेत विकास कामांचा आढावा घेतला. कोणत्या विभागाचा किती निधी खर्च झाला आहे. किती प्रमाणात नियोजन झाले आहे याबाबतची संपूर्ण माहिती घेतली. जिल्हा परिषदतर्फे आतापर्यंत ६५ टक्के निधी खर्च झाला असल्याचे विभाग प्रमुखांनी सांगितल्यानंतर पुढील दोन महिन्यात याचे प्रमाण वाढविण्याच्या सूचना त्यांनी विभागाप्रमुखांना दिल्या.

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

आर्थिक वर्षामध्ये जादा निधीची मागणी करणार
महिन्याच्या अखेरीस होत असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या आर्थिक वर्षामध्ये जादा निधीची मागणी करणार असल्याचे बनसोड यांनी सांगत त्यानुसार विभागाचे नियोजन झालेले असून जनसुविधेतंर्गत केल्या जाणाऱ्या कामांचे सुमारे १०० कोटी रूपयांचे प्रस्तावही जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केलेले आहे. यासह जिल्ह्यातील ५५० शाळांचे दुरुस्ती संदर्भात १ हजार १०० प्रस्ताव तयार आहे. त्यानुसार जादा निधीसाठी नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले. ५०० अंगणवाडी प्रस्तावित जिल्ह्यात आगामी दोन वर्षात ५०० नवीन अंगणवाडी तयार करण्याच्या दृष्टीने प्रस्ताव तयार असून बिगर आदिवासी क्षेत्रात ३०० व आदिवासी क्षेत्रात २०० अंगणवाडी निर्मिण करण्याचे उद्देश आहे.

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल