नाशिक : जिल्हा परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार घोषित

शिक्षिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला दिनाचे औचित्य साधून थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार 2022-23 जाहीर करण्यात आले. जिल्ह्यातील 15 तालुक्यांतून 15 स्त्रीशिक्षकांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व स्त्रीशिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी अभिनंदन केले आहे

पुरस्कार जाहीर झालेल्या शिक्षिका…
बागलाण : वर्षा शिवलाल खैरनार, जिप प्रशाला, सारदे, चांदवड : रंजना कृष्णा खैरनार, जिप शाळा, एकरुखे, देवळा : वैशाली आनंदा बच्छाव, जिप शाळा, झिरेपिंपळ, दिंडोरी : मनीषा हिरामण गायकवाड, जिप शाळा, जानोरी, इगतपुरी : सरला पांडुरंग अहिरे, जिप शाळा, कथ्रुगण, कळवण : गोदावरी पावजी चौरे, जिप शाळा, शिंगाशिपाडा, मालेगाव : सुनंदा शिवाजी सावळा, जिप शाळा, एरंडगाव, नाशिक : संगीता विष्णू नागपुरे, जिप शाळा, विल्होळी, नांदगाव : संगीता गुलाब पाटील, जिप शाळा, गवळीपाडा, निफाड : मंदाकिनी बालाजी भागवत, जिप शाळा, बोकडदरे, पेठ : नंदा वसंत जाधव, जिप शाळा, कोटंबी (क), सिन्नर : नीता प्रदीप कोष्टी, जिप शाळा, जयप्रकाशनगर, सुरगाणा : सुमित्रा राजाराम जाधव, जिप शाळा, उंबरठाण, येवला : सोनाली दिनकर दंडगव्हाळ, जिप शाळा, रामवाडी (सायेगाव), त्र्यंबकेश्वर : चित्राबाई विठोबा नाडेकर, जिप शाळा, वाढोली.

हेही वाचा:

The post नाशिक : जिल्हा परिषदेतर्फे सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार घोषित appeared first on पुढारी.