
नाशिक : पुढारी वत्तसेवा
जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्यात आले आहे. लवकरच फेरनिविदा काढणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इमारतीच्या डागडुजी आणि रंगरंगोटीसाठी ४७ लाखाचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम विभाग १ च्या माध्यमातून देण्यात आले होते. निविदेनुसार तीन महिन्यांच्या आत इमारतीची डागडुजी आणि रंगरंगोटी पूर्ण करणे अपेक्षित होते. मात्र मुदतीत काम न पूर्ण न झाल्याने कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सामान्य प्रशासन विभागाकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनाकडे जाणार्या जिन्याला नुकतेच काळ्या रंगाचे चमकदार कडप्पे बसविण्यात आले. मात्र याबाबत सीईओंशी चर्चा न करता तसेच फरशीचे सॅम्पल न दाखविता जुन्या पायर्या तोडून नवीन काळ्या रंगाचे चमकदार कडप्पे बसविण्यात आले. या कडप्प्यांवरून पाय घसरण्याची भीती व्यक्त होत आहे. याबाबत संबंधित अधिकार्यांना जाब विचारण्यात येऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असेही सीईओ मित्तल यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा :
- फळभाज्यांची स्वस्ताई ! कांदा, टोमॅटो, काकडी, कारली, दोडका, वांगी, ढोबळी मिरची, घेवडा स्वस्त
- चौफुला परिसरात बिबट्याची दहशत
- ई-चलन तत्काळ भरा, नाहीतर लायसन्स होईल रद्द
The post नाशिक : जिल्हा परिषद इमारतीच्या डागडुजीचे कंत्राट अखेर रद्द appeared first on पुढारी.