
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील निम्म्या ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच आहेत. मात्र, महिलांचे पती, मुलगा नातेवाईक हेच कारभार बघत असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत आता जिल्हा परिषदेच्या सीईओ मित्तल महिला सरपंचांची कार्यशाळा आयोजित करणार आहे. महिलांनी उत्तम प्रकारे कारभार बघितल्याची उदाहरणे आहेत. तशीच महिलांच्या आड तेथील पुरुषांनीच हा कारभार झेरॉक्स पद्धतीने हाकला असल्याची देखील उदाहरणे आहेत. हीच झेरॉक्स पद्धत बंद करण्यासाठी महिलावर्गाची कार्यशाळा जिल्हा परिषद सीईओ मित्तल घेणार आहेत.
हेही वाचा:
- नाशिक : महापालिकेच्या नऊ शाळा बनल्या स्मार्ट
- नाशिक : दीड लाखांची लाच घेणारा चालक कारागृहात
- गोवा : महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रंजीता पै
The post नाशिक जिल्हा परिषद : सीईओ मित्तल घेणार महिला सरपंचांची कार्यशाळा appeared first on पुढारी.